
पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनाहून परत येत असताना भक्तांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याचं वृत्त आहे. या अपघातात 3 जण ठार झाले असून 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव जवळ हा अपघात घडला आहे.
सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला शेगाव शहराच्या प्रवेशद्वारानजिक ही गाडी आली. त्यावेळी वेगात असलेल्या या गाडीचं नियंत्रण सुटून प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या खांबाला ती धडकली. त्यामुळे झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर 7 जण गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील काही गंभीर जखमींना अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. चालकाला डुलकी लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
























































