
गोपालनासाठी अनिवाहित राहुन आयुष्यभर कष्ट करणाऱ्या देवरुखमधील कोंडगाव पुर्ये धनगरवाडीतील व्यंक्या लांबोरे ( वय 87) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. आयुष्यभर गोपालनाचा वसा जोपासणाऱ्या व्यंक्या लांबोरे यांच्या ननिधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
धनगरवाडीत आई-वडिलांच्या पश्चात एकाकी जीवन जगत गुरे- ढोरे हेच कुटुंब मानून त्यांच्यासाठी कष्ट करणारे, खडतर आयुष्य जगलेले व्यंक्या लांबोरे लॉकडाउनच्या काळात एकाकी पडले होते. त्यांच्या घराची भिंतही ढासळली होती. त्यांच्या परिस्थितीची माहिती मिळाल्यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली होती. लांबोरे दोन दिवसांपासून पोटदुखीने ते त्रस्त होते. त्यातच त्याची अखेर झाली. गोपालनासाठी आयुष्य वेचलेल्या लांबोरे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.






























































