शेरनी, सरदार उधम सिंग ऑस्करच्या रेसमध्ये; 14 सिनेमांमधून एकाची हिंदुस्थानकडून होणार निवड 

पुढील वर्षी होणाऱ्या 94 व्या अॅपॅडमी अॅवॉर्ड अर्थात ऑस्करसाठी हिंदुस्थानी चित्रपटाच्या निवड प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये 14 चित्रपटांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. यापैकी एक सिनेमा ऑस्करसाठी हिंदुस्थानकडून अधिकृत एण्ट्री म्हणून पाठवण्यात येणार आहे. शॉर्टलिस्ट झालेल्या चित्रपटांमध्ये विकी कौशलचासरदार उधम सिंगआणि विद्या बालनचाशेरनीया चित्रपटांचा समावेश आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यानंतर बहुतेक राज्यांमध्ये थिएटर पुन्हा सुरू झाली आहेत. गेल्या दीड वर्षात  कोरोनाचा बॉलीवूडला मोठा फटका बसला असला तरी दर्जेदार चित्रपटांच्या निर्मितीत खंड पडला नाही. प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर शाजी एन. करन यांच्या अध्यक्षतेखाली फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या 15 सदस्यांची ज्युरी ऑस्कर अॅवॉर्डसाठी ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज’ या पॅटेगरीसाठी एका चित्रपटाची निवड करणार आहे. यात मल्याळम चित्रपट ‘नायटू’, तमीळ चित्रपट ‘मंडेला’ यांचाही समावेश आहे. गतवर्षी हिंदुस्थानकडून ‘जल्लीकट्टू’ हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. यंदाचा ऑस्कर सोहळा 27 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

इफ्फीत जगभरातील 300 सिनेमे 

52 वा इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अर्थात ‘इफ्फी’ महोत्सव यंदा 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात होणार आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता यंदा हा सोहळा हायब्रीड स्वरूपात होणार आहे. जगभरातील 300 हून अधिक चित्रपटांचा यंदाच्या इफ्फीत समावेश होणार आहे. चित्रपटांचे सादरीकरण, परिचर्चा, सहनिर्मिती, परिसंवाद आदींच्या माध्यमातून हा चित्रपट आणि कलेचा सोहळा साजरा केला जातो.