बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता करणार महाराष्ट्रीय पद्धतीत लग्न ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर हा लवकरच त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सुरुवातीला हे दोघे नोंदणी पद्धतीने लग्न करणार असल्याचे समोर आलेले मात्र आता हे दोघे महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar)

फरहान अख्तर हा मुसलमान असला तरी त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर ही हिंदू महाराष्ट्रीयन आहे. हे दोघे 19 फेब्रुवारी रोजी लग्न करणार आहेत. जावेद अख्तर यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

शिबानीच्या बहिणी अनुषा व अपेक्षा दांडेकर यांनी या जोडप्यासाठी गुरुवारी रात्री एक पार्टी आयोजीत केली आहे. त्यानंतर शुक्रवार सकाळपासून लग्नाच्या विधींना सुरुवात होणार असून शुक्रवारी संध्याकाळी दांडेकर व अख्तर कुटुंबीय खंडाळ्याला रवाना होणार असल्याचे समजते.