अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. ती आपल्या चाहत्यांना फोटो, व्हिडीओ टाकून अपडेट देत असते. साडी असो वा वेस्टर्न लूक शिल्पा त्यात अप्रतिम दिसते. नुकतेच शिल्पाने पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत आणि अवघ्या काही तासात त्याच्यावर लाईक्स, कॉमेण्ट्सचा पाऊस पडला आहे. या आऊटफीटवर शिल्पाने केस मोकळे सोडले असून चेहऱ्यावर हलका मेकअप केला आहे. या आऊटफीटमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत असून तिने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.