संजय राऊतांच्या भूमिकेला शिंदे गटाच्या मंत्र्यांचा पाठिंबा, म्हणाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील चाळीस गावं कर्नाटक मध्ये घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रश्नासाठी सर्व पक्षांनी एकत्रित आलं पाहिजे असे आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल होतं. या वक्तव्याला मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

शुक्रवारी जळगाव येथे पत्रकारांनी शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांना यासंदर्भात प्रश्न केला. त्यावर गुलाबराव पाटील राऊतांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले की, संजय राऊत यांच्या भूमिकेला मी पाठिंबा देतो. पहिले राज्य मग राष्ट्र हे उद्दिष्ट असलं पाहिजे. हे राज्य टिकवण्यासाठी अनेकांना आहुती दिली आहे. राज्यासाठी सर्वांनी आपला पक्ष बाजूला ठेवून एकत्र आला पाहिजे, असंही मत व्यक्त पाटील यांनी व्यक्त केलं.

राज्य अखंड ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं. आधी राष्ट्र, राज्य मग पक्ष. संजय राऊतांची ही भूमिका असेल तर त्यांना पाठिंबा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनीही यासाठी काम केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही काल स्पष्ट केलं आहे की, एकही महाराष्ट्रातलं गाव हे कर्नाटकात जाणार नाही, राज्याकरता पक्ष बाजूला सारला पाहिजे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.