थंड आणि आरामशीर प्रवास, विजयवाडा एक्सप्रेसला प्रथम श्रेणी वातानुकुलीत डबा जोडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साईनगर शिर्डी ते विजयवाडा दरम्यान धावणाऱ्या ‘विजयवाडा एक्सप्रेस’ मध्ये प्रथम श्रेणी वातानुकुलीत डबा जोडण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. हा डबा कायमस्वरूपी जोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. शिर्डीहून विजयवाड्याला जाणाऱ्या एक्सप्रेसचा क्रमांक 17207 असून त्या गाडीला 2 फेब्रुवारीपासून हा डबा जोडण्यात येणार आहे. विजयवाडा जंक्शनहून शिर्डीला येणाऱ्या एक्सप्रेसचा क्रमांक 17208 असून या गाडीला 1 फेब्रुवारीपासून हा डबा जोडण्यात येणार आहे. या एक्सप्रेसमध्ये प्रथम श्रेणी वातानुकुलीत सह वातानुकुलीत द्वितीय श्रेणी डबा, एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी डबा, दोन वातानुकुलीत तृतीय श्रेणी डबे, 9 शयनयान डबे आणि 5 द्वितीय श्रेणी आसन डबे असणार आहेत.