शिरुरमध्ये पाच मोरांच्या मृत्यूने खळबळ

शिरूर कासार तालुक्यातील लोणी गावाच्या शिवारात पाच मोरांचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडालेली आहे. घटनेची माहिती कळताच पशु वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लोणी गावच्या शिवारातील माळसोंडाच्या पायथ्याशी येताळा दादाबा महानोर. व अंबादास दत्तोबा केदार.यांच्या शेतामध्ये पाच मोरांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. यावेळी त्या ठिकाणी एक मोर जिवंत होता. मात्र थोड्याच वेळात त्या मोराने ही आपला जिव सोडला, असे प्रत्यक्षदर्शी भास्कर बडे यांनी त्यावेळी सांगितले.

दरम्यान या घटनेची माहिती पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्यानंतर घटनास्थळी शिरूरचे पशुवैधकीय अधिकारी डॉ.प्रदिप आघाव,वनविभागातील अधिकारी सायमा पठाण, परजणे आदींनी घडलेल्या घटनास्थळी भेट देऊन मृत्यू झालेल्या मोराची पाहणी केली. मृत्यू झालेल्या मोराचे नमुने पुढील तपासणीसाठी पुणे येथील रोग अन्वेशन प्रयोग शाळेत लगेच पाठविण्यात आले असल्याचे शिरुर पशुवैधकिय दवाखान्याचे डॉ.प्रदिप आघाव यांनी सांगितले

आपली प्रतिक्रिया द्या