शिवसैनिकाकडून ‘शिवसेना मदत निधी’साठी 51 हजारांचा धनादेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

माझा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करा असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर अंबाजोगाई येथील शिवसैनिक शिवाजी कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शिवसेनेच्या मदत निधी साठी 51 हजाराचा धनादेश शिवसेनाभवनमध्ये सुपूर्द केला. अंबाजोगाई येथील निष्ठावंत शिवसैनिक शिवाजी कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी हा निधी दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजी कुलकर्णी यांनी बॅनरवर खर्च टाळून हा निधी शेतकऱ्याच्या मदतीसाठी शिवसेनेच्या मदत निधी खात्यावर जमा करण्यासाठी दिला. मुंबईत त्यांनी शिवसेना भवनकडे चेक जमा केला. या वेळी सोबत शिवसैनिक उपस्थित होते. शिवाजी कुलकर्णी गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचे निष्ठेने काम करत आहेत.