शिवसेना उमेदवारांची संपूर्ण यादी, वाचा कोणत्या मतदारसंघात कोण आहे उमेदवार…

11888
shivsena-logo-new

राज्यामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रत्येक पक्षांकडून प्रचार सभांचा धडाका सुरू झाला आहे. राज्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार. त्यामुळे दिवाळीपूर्वीच विजयाचे फटाके वाजणार आहे.

विधानसभा२०१९ – महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, वाचा सविस्तर…

मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पारंपारिक दसरा मेळाव्यातून शिवसेनेचा प्रचाराचा नारळ फोडला. विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती 288 जागांवर निवडणूक लढवत आहे. शिवसेनेने 124 जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले असून प्रचाराचा धनुष्य ताणला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 3239 उमेदवार, वाचा कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार

यंदाच्या निवडणुकीचे विशेष म्हणजे ठाकरे घराण्यातील पहिला व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला आहे. शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक बडे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पाहूया प्रत्येक जिल्ह्यातील मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार कोण आहेत आणि त्यांची नावे…

संभाजीनगर – अब्दुल सत्तार (सिल्लोड), उदयसिंग राजपूत (कन्नड), प्रदिप जैस्वाल (संभाजीनगर मध्य), संजय शिरसाट (संभाजनगर पश्चिम), संदिपान भुमरे (पैठण), रमेश बोरनारे (वैजापूर)

नाशिक – सुहास कांदे (नांदगाव), दादा भुसे (मालेगाव बाह्य), मोहन गागुर्डे (कळवण), संभाजी पवार (येवला), राजाभाऊ वाजे (सिन्नर), अनिल कदम (निफाड), भास्कर गावीत (दिंडोरी), योगेश घोलप (देवाळाली), श्रीमती निर्मला गावीत (इगतपुरी)

ठाणे – शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण), पांडुरंग वरोरा (शहापूर), रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व), विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम), डॉ. बालाजी किणीकर (अंबरनाथ), रमेश सुकऱ्या म्हात्रे (कल्याण ग्रामीण), प्रताप सरनाईक (ओवळआ-माजिवडा), एकनाथ शिंदे (कोपरी-पाचपाखाडी), दिपाली सय्यद (मुंब्रा-कळवा)

मुंबई उपनगर – प्रकाश सुर्वे (मागोठाणे), सुनील राऊत (विक्रोळी), रमेश कोरगांवकर (भांडूप पश्चिम), रविंद्र वायकर (जोगेश्वरी पूर्व), सुनील प्रभू (दिंडोशी), रमेश लटके (अंधेरी पूर्व), दिलीप लांडे (चांदिवली), विठ्ठल लोकरे (मानखूर्द-शिवाजीनगर), तुकाराम काते (अणुशक्ती नगर), प्रकाश फातर्फेकर (चेंबूर), मंगेश कुडाळकर (कुर्ला), संजय पोतनीस (कलीना), विश्वनाथ महाडेश्वर (वांद्रे पूर्व)

मुंबई शहर – आशिष मोरे (धारावी), सदा सरवणकर (माहिम), आदित्य ठाकरे (वरळी), अजय चौधरी (शिवडी), सौ. यामिनी जाधव (भायखळा), पांडुरंग सकपाळ (मुंबादेवी)

रायगड – महेंद्र थोरवे (कर्जत), मनोहर भोईर (उरण), महेंद्र दळवी (अलिबाग), विनोद घोसाळकर (श्रीवर्धन), भरतशेठ गोगावले (महाड)

पुणे – शरद सोनवणे (जुन्नर), राजाराम बाणखेले (आंबेगाव), सुरेश गोरे (खेड आळंदी), विजय शिवतारे (पुरंदर), कुलदीप कोंडे (भोर), गौतम चाबुकस्वार (पिंपरी)

नगर – साहेबराव नवले (संगमनेर), भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर), विजय औटी (पारनेर), अलि राठोड (नगर शहर)

पालघर – श्रीनिवास वनगा (पालघर), विलास तरे (बोईसर), प्रदीप शर्मा (नालासोपारा), विजय पाटील (वसई)

सोलापूर – रश्मी बागल (करमाळा), संजय कोकाटे (माढा), दिलीप सोपल (बार्शी), नागनाथ क्षीरसागर (मोहोळ), दिलीप माने (सोलापूर शहर मध्य), शहाजी पाटील (सांगोले)

सातारा – महेश शिंदे (कोरेगाव), धैर्यशील कदम (कराड उत्तर), शंभुराजे देसाई (पाटण)

रत्नानगिरी – योगेश कदम (दापोली), भास्कर जाधव (गुहागर), सदानंद चव्हाण (चिपळूण), उदय सामंत (रत्नागिरी), राजन साळवी (राजापूर)

कोल्हापूर – संग्राम कुपेकर (चंदगड), प्रकाश आंबिटकर (राधानगरी), संजय घाटगे (कागल), चंद्रतीप नरके (करवीर), राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), सत्यजित पाटील (शाहूवाडी), डॉ. सुजित मिणचेकर (हातकणंगले), उल्हास पाटील (शिरोळ)

सांगली – गौरव नायकवडी (इस्लामपूर), संजय विभुते (पलुस-कडेगांव), अनिल बाबर (खानापूर), अजितराव घोरपडे (तासगांव-कवठेमहांकाळ)

जळगाव – सौ. लता चंद्रकांत सोनावणे (चोपडा), गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), चिमणराव पाटील (एरंडोल), किशोर पाटील (पाचोरा)

बुलढाणा – संजय गायकवाड (बुलढाणा), डॉ. शशिकांत खेडेकर (सिंदखेडराजा), डॉ. संजय राजमुलकर (मेहकर)

अमरावती – श्रीमती प्रिती संजय बंड (बडनेरा), राजेश वानखडे (तिवसा), सौ. सुनिता फिसके (अचलपूर)

नांदेड – नागेश आष्टीकर (हदगाव), बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर), सौ. राजश्री पाटील (नांदेड दक्षिण), मुक्तेश्वर धोंडगे (लोहा), सुभाष साबणे (देगलूर)

हिंगोली – जयप्रकाश मुंदडा (वसमत), संतोष बांगर (कळमनुरी)

नंदुरबार – अमशा पाडवी (अक्कलकुवा)

धुळे – हिलाल माळी (धुळे शहर).

अकोला – नितीन देशमुख (बाळापूर)

वाशिम – विश्वनाथ सानप (रिसोड)

वर्धा – समीर देशमुख (देवळी)

चंद्रपूर – संदीप गड्डमवार (ब्रह्मपुरी), संजय देवतळे (वरोरा)

यवतमाळ – संजय राठोड (दिग्रस)

परभणी – डॉ. राहुल पाटील (परभणी), विशाल कदम (गंगाखेड)

जालना – हिकमत उडाण (घनसावंगी), अर्जुन खोतकर (जालना)

बीड – जयदत्त क्षीरसागर (बीड)

लातूर – सचिन देशमुख (लातूर ग्रामीण)

धाराशीव – ज्ञानराज चौगुले (उमरगा), कैलास पाटील (धाराशीव), तानाजी सावंत (परांडा)

सिंधुदुर्ग – वैभव नाईक (कुडाळ), दीपक केसरकर (सावंतवाडी)

आपली प्रतिक्रिया द्या