शेतकऱयाने केली कापसाची होळी कापूस खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्याची शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विदर्भ-मराठवाडय़ातील कापूस उत्पादक शेतकऱयांचा लाखो क्विंटल कापूस खासगी व्यापारी पडक्या दरात अक्षरशः लुटून नेत आहेत. किमान आधारभूत किंमतदेखील मिळत नसल्यामुळे शेतकऱयांमध्ये प्रचंड संताप असून एका शेतकऱयाने तर कापूस खरेदी केंद्रावर कापसाची होळी केली.

शेतकऱयांचे हे हाल थांबवण्यासाठी सीसीआय अर्थात कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची कापूस खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावी अशी मागणी शेतकरी नेते आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवत्ते किशोर तिवारी यांनी आज सरकारला केली होती. परंतु, आज सोमवारी सीसीआयची कापूस खरेदी केंद्रे मोजक्याच ठिकाणी उघडण्यात आली. त्याठिकाणी कापूस नेला असता काही तांत्रिक कारणे समोर करून तो घेतला नाही. त्यामुळे एका शेतकऱयाने कापसाची होळी केली. वस्त्राद्योग मंत्री पियूष गोयल, राज्यमंत्री दर्शना जरदोष आणि वस्त्राsद्योग सचिव रचना शहा यांनी केवळ उच्च प्रतीचा कापूस घ्यावा असे सांगितल्याचे कारण पुढे करण्यात आले.