
शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजय मिळवला. विजयानंतर निवडणूक आयोगाकडून विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारून त्यांनी जनतेचे आभार मानले.
https://www.saamana.com/aurangabad-district-shiv-sena-bjp-mahayuti-won-all-seat/
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वरळीतून दणदणीत विजय झाला आहे. आदित्य ठाकरे यांनी 67 हजाराहूंन अधिक मताधिक्यानं विजय मिळवला. ठाकरे कुटुंबातून प्रथमच निवडणूक लढवणाऱ्या आदित्य यांनी विजय मिळवत इतिहास घडवला आहे. आदित्य हे ठाकरे घराण्यातील पहिले आमदार ठरले आहेत. आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. सुरेश माने यांचा पराभव केला आहे.
युवासेनाप्रमुख @AUThackeray यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजय मिळवला. यावेळी निवडणूक आयोगाकडून विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारून त्यांनी जनतेचे आभार मानले. pic.twitter.com/lMJzGZN2l7
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) October 24, 2019





























































