अटक केली तरी झुकणार नाही, वैभव नाईक यांनी भाजपला ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जी चौकशी होईल त्याला मी सामोरा जाईन. माझ्याकडे एक रुपया जरी बेहिशेबी असेल तर मला फासाकर लटकवा, असे माझे पोलिसांना आव्हान आहे. परंतु, मला अटक करून मी भाजपसमोर झुकेन असे कोणाला वाटत असेल तर हे शक्य होणार नाही, असे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी ठणकावून सांगितले.

भाजपकडून दबावाचे राजकारण सुरू आहे. माझ्याविरोधात सुरू असलेले एसीबी कारवाईचे प्रकरण हा त्याचाच एक आहे. याच गोष्टीला आमचा विरोध आहे. तुम्ही दबाव आणणार आणि तुमच्या दबावाला भीक घालून आम्ही तुमच्या पक्षात येणार असा समज असेल तर तो चुकीचा आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, मी या कारवाईला भीक घालणार नाही व दबावाला झुकणार नाही, असे वैभक नाईक यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)