ती नकली दाढी अमित शहा कधी कातरतील कळणारही नाही, संजय राऊत यांचा जबरदस्त टोला

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांना जोरदार टोला लगावला आहे. ”त्यांची ती दाढी नकली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ती कधी कातरतील ते त्यांना कळणारही नाही, अशा जबरदस्त टोला लगावला.

”शिंदेंच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. जे महाराष्ट्रात जय गुजरात म्हणतात ते महाराष्ट्राचे राहिले आहेत का? आद सकाळी नाश्त्यातही त्यांनी ढोकळा फाफडा खाल्ल्याचे मला समजले आहे. ते आता बटाटेवडे, कांदापोहे खात नाही. ते आता ढोकळा फाफडा खातात”, असाही टोला संजय राऊत यांनी लगावला.

”एकनाथ शिंदे यांची ती दाढी नकली आहे, ती अमित शहा कधी कातरतील त्यांना कळणारही नाही. ती गद्दाराची दाढी आहे. अफजल खानाची दाढी आहे. ती शाहिस्तेखानाची दाढी आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.