ही हुकुमशाहीच्या अंताची सुरुवात आहे, उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला फटकारले

अब्रुनुकसानीच्या खटल्यात सूरत न्यायालयाने दोषी ठरवल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यांच्यावरील कारवाईवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रीया देत केंद्र सरकारला फटकारले आहे. ”राहुल गांधी यांच्यावरील कारवाई म्हणजे हुकुमशाहीच्या अंताची सुरुवात आहे” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला फटकारले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)


”राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणे हा गुन्हा ठरला आहे. चोर देश लुटणारे आजही मोकळे आहेत व राहूल यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाही चे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत हुकूमशाहिच्या अंताची ही सुरुवात आहे. लढत राहू” अशा परखड शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.