हे भाजपचे प्रवक्ते की अदानीचे? शिवसेनेचा खोचक सवाल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात शनिवारी धारावीकरांना पाठिंबा देण्यासाठी महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी भाषण करत भाजप, मिंधे सरकार व अदानींवर जोरदार हल्लाबोल केला. रविवारी देखील शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून भाजप नेत्यांना फटकारले आहे.

शिवसेनेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांच्याकडून अदानीविरुद्ध बोलल्यावर भाजप नेत्यांना राग का येतो? असा सवाल करत खाली देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रशेखऱ बावनकुळे, नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांचे फोटो छापण्यात आले असून सोबत हे भाजपचे प्रवक्ते आहेत की अदानीचे? असा खोचक सवाल करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये मोदींचा कृष्णधवल फोटो वापरून अदानींचा मोठा फोटो वापरण्यात आला आहे. तसेच अदानींच्या फोटोवर ‘खरा बॉस’ असे लिहण्यात आलेले आहे.