
खोपोलीत शनिवारी शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दणदणीत मेळावा पार पडला. या वेळी निष्ठावंत आणि ज्येष्ठ शिवसैनिकांचा गौरव करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या मेळाव्यात एकीची वज्रमूठ वळण्याचा निर्धार करतानाच पुढील तीन वर्षे महत्त्वाची आहेत. त्यामुळे मतदार नोंदणीच्या कामाला आतापासूनच सुरुवात करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले.
निष्ठावंत शिवसैनिकांचा सन्मान सोहळा तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचा सन्मान खोपोलीतील महाराजा मंगल कार्यालयात करण्यात आला. या वेळी माजी महापौर व मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना उपनेते बबन पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुका संपर्कप्रमुख उमेश गावंड, कर्जत तालुकाप्रमुख बाजीराव दळवी, ज्येष्ठ शिवसैनिक नवीन घाटवळ, गजानन पाडगे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती उत्तम कोळंबे, कर्जत पंचायत समिती उपसभापती चित्रा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे, वैशाली खैर, पंचायत समिती सदस्य प्रमिला पाटील, कमल भस्मा, विभागप्रमुख प्रफुल विचारे, युवासेना उपजिल्हा अधिकारी महेश पाटील, तांबाटी सरपंच अविनाश आमल, युवासेना तालुका अधिकारी अंकुर बामणे, उपतालुका अधिकारी निखिल मालुसरे, पंचायत समिती माजी सभापती रमेश पाटील, माजी महिला जिल्हा संघटक रेखा ठाकरे, उपजिल्हा संघटिका अनिता पाटील, सुविधा विचारे, किशोरी शिगवण, कविता पाटील, प्रमिला बोराडे, खालापूर शहरप्रमुख संभाजी पाटील, संघटक दिलीप पुरी, प्रवक्ते विलास चाळके यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक व महिला आघाडी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांनी सर्वांचे आभार मानतानाच शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीनिमित्त असंख्य कार्यक्रम राबवून शिवसेना घराघरांत पोहोचवून आणखी मजबूत करू असा निर्धार केला.



























































