सुधाकर बडगुजर यांना अटकपूर्व अंतरिम जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसीबीने दाखल केलेल्या गुह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह तिघांना अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर झाला आहे.

अॅण्टी करप्शन ब्युरोने सुधाकर बडगुजर, साहेबराव रामदास शिंदे, सुरेश भिका चव्हाण या तिघांविरुद्ध 17 डिसेंबर रोजी फसवणूक व भ्रष्टाचाराची तक्रार दिली. त्यावरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एसीबीमार्फत चौकशीही सुरू आहे. बडगुजर यांच्यासह वरील तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी नाशिक न्यायालयात अर्ज दाखल केला. तिघांनाही न्यायालयाने नऊ जानेवारी 2024 पर्यंत अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला, अशी माहिती अॅड. एम. वाय. काळे यांनी दिली.