
सामना ऑनलाईन । अयोध्या (फैजाबाद)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज दुपारी आपला दोन दिवसाचा अयोध्या दौरा आटोपून मुंबईकडे निघाले. यावेळी अयोध्या (फैजाबाद) विमानतळावरून त्यांचे विमान उड्डाण घेत असताना धावपट्टीवर अचानक नीलगाय आली. मात्र कोणत्याही अडथळ्याशिवाय विमानाने यशस्वी उड्डाण केले.
ही दृश्य तिथे उपस्थित असलेल्या मीडिया प्रतिनिधींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. यावेळी विमानात उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे आणि युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे देखील आहेत.
विमानाच्या यशस्वी उड्डाणामुळे संकट टळले असले, तरी धावपट्टीवर अचानक नीलगाय कशी आली याची चौकशी होण्याची शक्यता आहे.




























































