
शिवसेना-युवासेना आणि भारतीय विद्यार्थी सेना (शाखा क्र. 117) आयोजित युवा जल्लोष सी सर्कल महिला आणि पुरुष क्रिकेट स्पर्धा शनिवारपासून 3 ते 4 डिसेंबर 2022 या कालावधीत महापौर मैदान, कांजुरमार्ग (पूर्व) येथे सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत रंगणार आहे. युवासेना सहसचिव आणि शाखा समन्वयक योगेश श्रीधर पेडणेकर हे या स्पर्धेचे आयोजक असून शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही शानदार क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. क्रीडा क्षेत्राबाबतची क्विझ कॉन्टेस्ट (प्रश्नमाला) हे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
अंडर आर्म (सी सर्कल) बॉक्स पद्धतीने खेळवल्या जाणाऱया या स्पर्धेत पुरुष आणि महिला गटांसाठी वेगवेगळय़ा लढती होणार आहेत. पुरुषांची स्पर्धा शनिवारी 3 डिसेंबर तर महिलांची स्पर्धा रविवार, 4 डिसेंबरला रंगणार आहे. स्पर्धेला हर्षल इलेव्हनचे विशेष सहाय्य लाभणार आहे. स्पर्धेतील विजेत्या पुरुष संघाला रोख रुपये 22,222 आणि चषक तर उपविजेत्या संघाला रोख रुपये 11,111 आणि चषक बहाल करण्यात येणार आहे. महिला गट विजेत्यांना रोख रुपये 15,555 आणि चषक तर उपविजेत्यांना 11,111 आणि चषक पारितोषिकादाखल देण्यात येणार आहे. सामनावीराला टी-शर्ट आणि मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांना चषक आणि भेटवस्तू देण्यात येणार आहे.