
सामना प्रतिनिधी । हिंगोली
जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात एकाही शेतकऱ्याला पीकविमा मिळाला नसून वसमत तालुक्यातील बहुतांश शेतकरी पीकविम्यापासुन वंचित आहेत. पीकविमा मिळण्यासाठी कुणाकडे विचारणा करावी, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. यामुळे शासनाने सर्व वंचित शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम तातडीने द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी सहकारमंत्री आणि आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीकविम्याची अत्यल्प रक्कम मिळाली आहे. याबाबत महसूल प्रशासन आणि विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी विचारणा केल्यानंतर त्यांना कोणीही दाद देत नाही. यामुळे शिवसेनेचे आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी गुरुवारी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आवाज उठविला.
































































