कोरोना बाधितांसाठी शिवसेनेची मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविडची लागण झालेल्या घरी एकटे राहणाऱ्या आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी शिवसेना धावून आली आहे. या रुग्णांसाठी मोफत घरपोच जेवणाची व्यवस्था, औषधे आणि सर्व सोसायट्या व मंडळांसाठी सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवसेना शाखा क्र. 204 आणि नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहितीसाठी आणि मदतीसाठी 7039081155 या मोबाईलवर संपर्क करावा, असे आवाहन अनिल कोकीळ यांनी केले आहे.