
ऐन दिवाळी सणाला मध्य प्रदेशात झालेल्या भीषण अपघातात 10 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 4 महिलांचा समावेश आहे. अपघातात 9 जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील शिवपुरी पोहरीजवळ एक पिक अप उलटून हा अपघात झाला आहे. या पिक अप व्हॅनमध्ये सुमारे 40 प्रवासी होते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी पिक व्हॅनमध्ये होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन उलटल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवपुरी जिल्ह्यातील पोहरीहून एक पिक अप व्हॅन प्रवाशांना घेऊन विजयपूरकडे निघाली होती. पोहरीहून गाडी सुमारे 7 किलोमीटर पुढे आली होती. त्यानंतर अचानक एका वळणार व्हॅन उलटली. व्हॅनमध्ये असलेल्या 40 प्रवाशांपैकी 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 6 पुरुष आणि 4 महिला आहेत. तर अपघातात 9 जण जखमी झाले आहेत. त्यांना पोहरीतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिवाळीनिमित्त घरी परतणाऱ्या मजुरांचा अपघातात मृत्यू झाला आहे. पिकअप व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. तसेच वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन उलटून अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दिवाळी सणाला घरी परतणाऱ्या मजुरांचा अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

























































