
सामना प्रतिनिधी । धारूर
धारूर येथील कट्टर शिवसैनिक बाबासाहेब शिवाजीराव घोडके (43) यांनी स्वतः वर गावठी पिस्तुल मधून गोळी झाडून आत्महत्त्या केल्याची घटना गुरूवारी पहाटे 4 वा घडली.
धारूर येथील विद्यार्थी दशेपासून शिवसेने सोबत निष्ठेने काम केले विद्यार्थी सेनेचे शहर प्रमुख या पदावर त्यांनी काम केले होते, कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती, गेल्या काही दिवसांपासून ते कौटुंबिक कलहामुळे ते अस्वस्थ होते, गुरूवारी पहाटे चार वाजता त्यांनी गावठी पिस्तुलाने गोळी झाडून आत्महत्त्या केली. या घटनेने धारूर मध्ये खळबळ उडाली आहे.
































































