कमळाबाई आणि रौफ मेमन ‘1993–अ लव्ह स्टोरी’, फडणवीस, पाटील आणि राज्यपालांचे फोटो व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

याकूब मेमनच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादाला राजकीय रंग चढू लागला आहे. याकूबचा चुलत भाऊ रौफ याचा व्हिडीओ पोस्ट करून शिवसेनेवर आरोप करणाऱ्या भाजपला आता जशास तसे उत्तर मिळाले आहे. कमळाबाई आणि रौफची ‘1993-ए लव्ह स्टोरी’च शिवसेना-काँग्रेसने जगासमोर आणली असून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचा तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबतचा रौफ मेमनचा फोटो व्हायरल झाला आहे.

1993मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्पह्ट झाले. दाऊद, टायगर आणि याकूब मेमन यांनी केलेला हा दहशतवादी हल्लाच होता. याकूब मेमनला पोलिसांनी पकडले आणि 2015मध्ये फासावर लटकवले. नंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करून बडा कब्रस्तानात दफन केला. आता याकूबच्या कबरीच्या सुशोभीकरणावरून भाजपने गलिच्छ राजकारण सुरू केले आहे. कबरीच्या सुशोभीकरणाला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा कांगावा भाजप करत असले तरी 2015मध्ये राज्यात व पेंद्रात भाजपचे सरकार होते. दहशतवादी कसाबचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांना दिला नाही, मग याकूबचा मृतदेह कसा ताब्यात दिला? या प्रश्नावर भाजपने मौन बाळगले आहे. आता तर विकासकामांच्या बैठकीचा व्हिडीओ व्हायरल करून भाजपने स्वतःचे हसे तर करून घेतले आहेच, पण 1993च्या बॉम्बस्पह्टातील आरोपीच्या नातेवाईकांशी कशी ‘लव्ह स्टोरी’ सुरू होती याचे पुरावेच कमळाबाईने दिले आहेत.

रौफ मेमन हा याकूबचा चुलत भाऊ. तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतलेल्या विकासकामांच्या बैठकीत रौफ उपस्थित होता. त्या बैठकीचा व्हिडीओ भाजपने पोस्ट करून पुन्हा शिवसेनेवर आरोप करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढील काही तासांतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एवढेच काय तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे रौफसोबतचे तेसुद्धा खास सत्कार करतानाचे फोटो शिवसेनेने सोशल मीडियावर पोस्ट करून भाजपचे दात घशात घातले आहेत. या पह्टोंच्या खाली ‘बारा तोंडाचे भाजपवाले यावर काय उत्तर देणार?’ अशी सणसणीत विचारणाही करण्यात आली आहे.

मुंबईच्या काही भागांत पाणी तुंबले होते. वीजपुरवठा खंडित झाला होता. महापौर या नात्याने या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मी मंदिरे, गुरुद्वारा, जैन मंदिरे, मशिदीत गेले होते. त्या वेळी शिवसेनेत असलेले यशवंत जाधवही आमच्यासोबत होते. त्या बैठकीला महापालिकेचे अधिकारीही उपस्थित होते. असे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करून भाजप काय सांगू पाहत आहे, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी विचारला आहे.

धर्मांधता पसरवणे हा यांचा धंदा आहे

भाजपने गलिच्छ राजकारण सुरू केले असून हा शिवसेनेच्या बदनामीचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. धर्मांधता पसरवायची हा यांचा धंदा असल्याचे काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे. तर लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा भाजपचा डाव असून या गोष्टीला महत्त्व देण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.