आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी शिवसेना आमदार कैलास पाटलांकडून दिड लाखांची मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर उघड्यावर पडलेल्या कुटुंबासाठी धाराशिवचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास घाडगे पाटील आधार बनले आहेत. आमदारांच्या मदतीमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीचा शैक्षणीक मार्ग सुकर झाला आहे.

कळंब तालुक्यातील ईटकूर येथील अविनाश राजाराम गंभीर यांनी कर्जबारी झाल्याने आत्महत्या केली होती. यामुळे त्यांचे कुटुंब उघडयावर आले. शेतीवर उपजीविका भागवणाऱ्या या कुंटुबाला कुणाचा आधारच नव्हता. त्यातच मुलगी अश्विनी अविनाश गंभीरे हिचा नंबर लातूरच्या शाहू कॉलेज येथे लागला होता. मात्र शिक्षणासाठी कुटुंबाकडे पैसे नव्हते.

आमदार कैलास घाडगे पाटील यांनी गंभीरे कुटुंबाची प्रत्यक्षात भेट घेऊन सांत्वन केले व मुलगी अश्विनी हिची शैक्षणिक जवाबदारी घेतली. आमदार कैलास पाटील यांचे बंधू आतिष पाटील ,शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी आप्पा कापसे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन अश्विनी गंभीरे हिला दिड लाख रोख स्वरूपात दिले. यामुळे अश्विनीचा शैक्षणीक खर्चाचा मार्ग सुकर झाला.

यावेळी कळंब शिवसेना तालुका अध्यक्ष शिवाजी कापसे, शिवसेना तालुका उपाध्यक्ष भारत सांगळे, शिवसेना शहर अध्यक्ष प्रदिप मेटे, कळंब प.स.माजी उप सभापती लक्ष्मण आडसुळ, ईटकुर उपसरपंच विलास गाडे, ग्रा.प.सदस्य आबासाहेब आडसुळ, गुंडेराव गंभीरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष विजय माने, बाळासाहेब गंभीरे, धनंजय गंभीरे, श्रीमंत आडसुळ, चंद्रकांत आडसुळ, दादा गंभीरे उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण हा मुलमंत्र आम्हासारख्या शिवसैनिकांना दिला. त्याप्रमाणेच शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आपण शेतकऱ्यांच्या अडीअडचणीसाठी उभे राहत असुन सर्वसाधारण घरातील मुल शिकली पाहिजेत यासाठी काम करत असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.