
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरीता शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी मेहकर येथे मुंडण करून पाठिंबा दिला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरीता ९ ऑगस्टला राज्यात आंदोलन झाले होते. मेहकर तालुक्यात मराठा बांधव स्थानिक जिजाऊ चौकात मुंडण करून आंदोलनात सहभागी होत होते मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमुलकर हेही त्या दिवशी जिजाऊ चौकात पोहोचले व त्यांनी मुंडण करून आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी केली होती हे विशेष.























































