शेतकर्‍यांना विम्याचे पैसे न मिळाल्यास हे रुमणे कुठे घुसेल कळणार नाही, अरविंद सावंतांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकर्‍यांना विम्याचे हक्काचे पैसे मिळावेत या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एल्गार ‘रूमणे मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात खासदार अरविंद सावंत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.

ते म्हणाले की आज प्रश्नच प्रश्न आहेत. उत्तर कोण देणार? उत्तर जर त्यांनी दिलं नाही तर शिवसेना त्यांच्याकडून उत्तर घेणार. आज केवळ हा मोर्चा काढुन आम्हीं स्वस्थ बसणार नाही. तर शेतकर्‍यांना न्याय मिळवुन देणार. शेतकर्‍यांना विम्याचे हक्काचे पैसे मिळालेच पाहिजेत नाहीतर हे रुमणे कुठे घुसेल तुम्हांला कळणार नाही.