
सामना ऑनलाईन । पुणे
पुण्यात शिवशाहीसह 4 ते 5 खासगी बस गाड्यांना आग लागल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे परिसरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. सातारा रस्त्यावर शिंदेवाडी येथे गॅरेजमधे असणाऱ्या शिवशाही व खाजगी 4 ते 5 बस गाड्यांना आज अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि मात्र या आगीत काही बस जळून खाक झाल्या आहेत.
दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे सांगण्यात येते आहे.
























































