शांघायमध्ये ‘5 जी’ नेटवर्क चीनचा दावा; जगातील पहिले शहर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पेईचिंग

‘4 जी’च्या तुलनेत 100 टक्के जास्त डाऊनलोडिंग स्पीड देणारे ‘5 जी’ नेटवर्क चीनच्या शांघाय शहरात सुरू झाले असून 5 जी सेवा सुरू करणारे शांघाय शहर हे जगातील पहिलेच शहर असल्याचा दावा चीनने केला आहे.

चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘चायना डेली’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शांघायने 5 जी कव्हरेज आणि ब्रॉडबॅण्ड नेटवर्क सेवा देणारे जगातील पहिले शहर असल्याचा दावा केला आहे. चीनची दूरसंचार कंपनी चायना मोबाईलनेही शांघायच्या या दाव्याला पाठिंबा दिला आहे. मागील तीन महिन्यांपासून शांघायमध्ये 5 जी सबस्टेशन बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. शांघायचे उपमहापौर वु क्विंग यांनी 5 जी फोल्डेबल फोन हुवावे मेट एक्सवरून पहिला व्हिडीओ कॉल केला.