कॅलिफोर्नियामध्ये गोळीबार, तिघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । कॅलिफोर्निया

अमेरिकेच्या लॉस एंजीलिस जवळ शनिवारी दुपारी गोळीबार झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला होता की नाही याबाबत हे अद्याप सांगणे कठीण आहे. गोळीबारापूर्वी घटनास्थळी मोठे भांडण झाले होते.

कॅलिफोर्नियाच्या पोलिसांनी ट्विटरवर म्हटले आही की, “आम्हाला गोळीबाराची माहिती मिळाली आहे. ज्यात काही लोक जखमी झाले आहेत. याबाबत तपास सुरू आहे.” या भागात लोकांनी जाऊ नये असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.