श्रद्धा वालकरचे शिर आणि हत्येसाठी वापरलेले हत्यार अद्याप सापडले नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रद्धा वालकर हित्या हत्या प्रकरणाचा तपास वेगाने करण्याचा दिल्ली पोलीस प्रयत्न करत आहेत. मात्र पोलिसांना अद्याप हत्येसाठी वापरण्यात आलेले हत्यार आणि श्रद्धाचे शिर अद्याप सापडलेले नाहीये. श्रद्धाच्या शरीराचे अवशेष हे तिचेच आहेत की नाही, हे पटवण्यासाठी श्रद्धाच्या वडिलांचे डीएनए सँपलही घेण्यात आले आहेत. पोलिसांना श्रद्धाचा मोबाईलही सापडलेला नाहीये. पोलिसांसाठी चिंतेचा विषय हा आहे की आफताब हा पोलिसांची सातत्याने दिशाभूल करत असून तो नीट माहिती देत नाहीये. पोलिसांना सबळ पुरावे मिळवण्यासाठी मेहरौलीचे जंगल खंगाळावे लागत असून हे जंगलच त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे.

पोलीस या प्रकरणाच्या तपासासाठी 16 नोव्हेंबरला पहिल्यांदा  मेहरौलीच्या जंगलात पोहोचले होते. तेव्हापासून माध्यमांना जंगलात जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. जंगलात जाण्याच्या मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आतमध्ये कोणालाही सोडण्यात येत नाहीये. एकीकडे जंगलामध्ये पुरावे शोधत असतानाच पोलिसांनी आफताबच्या घराची अनेकदा बारकाईने तपासणी. त्याच्या घरात पोलिसांना रक्ताचे डाग सापडले असून ते श्रद्धाचे असावेत असा पोलिसांना संशय वाटतो आहे. श्रद्धाचा खून केल्यानंतर आफताबने रक्ताने माखलेले कपडे हे कचऱ्याच्या गाडीत फेकून दिले होते. ही गाडी आणि आफताबचे रक्ताने माखलेले कपडे पोलीस शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत, ते सापडले तर पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागेल.

आफताबने श्रद्धाला ठार मारल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे केले होते. यानंतर त्याने श्रद्धाची ओळख पटू नये यासाठी तिचा चेहरा जाळण्याचाही प्रयत्न केला होता. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्याचं काम आफताब जवळपास 10 तास करत होता. हे काम करत असताना थकल्याने त्याने बिअर प्यायली होती आणि नंतर झोमॅटोवरून जेवण मागवलं होतं. नेटफ्लिक्सवर सिनेमा बघता बघता त्याने जेवण केलं होतं आणि नंतर जाऊन तो झोपला होता. श्रद्धाच्या हत्येनंतर घरभर झालेलं रक्त साफ करण्यासाठी आफताबने अॅसिड आणलं होतं. सल्फर हाइपोक्लोरिक अॅसिड वापरून त्याने रक्ताचे डाग पुसून टाकले होते.