श्रेयसकडे नेतृत्व आणि वैभवचा संघप्रवेश, आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीसीसीआयच्या निवड समितीने आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरची नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादवला मात्र संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. याचबरोबर अवघ्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला आयपीएलमधील धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर प्रथमच संघात स्थान मिळाले आहे. उपकर्णधारपदाची जबाबदारी अक्षर पटेलकडून काढून ती तिलक वर्माकडे सोपवण्यात आली आहे.

सूर्यकुमारचा पत्ता का कट?

35 वर्षीय सूर्यकुमार यादवने मार्चमध्ये हिंदुस्थानला सलग दुसरा टी-20 विश्वचषक जिंकून दिला होता. नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषकात त्याला नऊ डावांत 242 धावा करता आल्या होत्या. यंदा आयपीएलमध्येही त्याने 13 डावांत केवळ 270 धावा केल्या.

आयर्लंडइंग्लंड दौऱ्यासाठी हिंदुस्थानचा टी-20 संघ श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव आणि वैभव सूर्यवंशी.

श्रीलंका दौऱ्यासाठी हिंदुस्थान संघ ध्रुव जुरेल (कर्णधार), बी. साई सुदर्शन, आयुष पांडे, देवदत्त पडिक्कल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, हर्ष दुबे, सारांश जैन, गुरनूर ब्रार, औकिब नबी, यश ठाकूर, अंशुल कंबोज, एन. जगदीशन, झिशान अन्सारी, अमन मोखाडे आणि शेख रशीद.