
दापोली शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेले श्री हनुमान मंदीर हे शहरवासीयांसह तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे अशा या येथील मंदिरात श्री देव मारुती व श्री देव शंकर ट्रस्ट फंड बाजारपेठ दापोली यांच्या वतीने या मंदिरात वर्षभरात विविध प्रकारचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा प्रकारचे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या कार्यक्रमांमधील श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा हा विशेष सोहळा असतो . अशा या श्री हनुमान जन्मोत्सव २०२६ च्या कार्यक्रमाची रविवारी २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ६ वाजता श्रींचे भजन व आरती कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. अशा उत्सव कार्यक्रमाची सांगता ७ एप्रिल २०२६ रोजी ओम चैतन्य प्रासादिक भजन मंडळ बुवा श्री. श्रीकांत शिरसाट उंबर्डे वैभववाडी विरुद्ध श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ बुवा कु. सुशांत दिलीप जोईल ,कातवण देवगड यांच्या डबलबारी भजनाच्या जंगी सामनाने होणार आहे.
दापोली शहरातील श्री हनुमान मंदीरात श्री. हनुमान जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमाला रविवारी सकाळी मोठ्या उत्साहात भक्तीभावाने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमांमध्ये सोमवारी ३० मार्च रोजी सकाळी ६ वाजता श्रींचे भजन व आरती सकाळी ८ वाजता ” महारुद्र ” रात्रौ साडेनऊ वाजता नागपूर येथील सुप्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प. श्री दिगंबरबुवा यांच्या सृश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम , मंगळवारी ३१ मार्च व बुधवारी १ एप्रिल रोजी दोन्ही दिवशी सकाळी ६ वाजता श्रींचे भजन व आरती तर रात्री १०.३० वाजता नागपूर येथील सुप्रसिध्द किर्तनकार ह.भ.प. दिगंबरबुवा नाईक नागपूर यांचे कीर्तन , गुरुवारी २ एप्रिल रोजी पहाटे साडेपाच वाजता श्री हनुमान जन्मकाळ किर्तन,सकाळी ६.२० वाजता श्रींचा जन्मकाळ , सकाळी ७.३० ते रात्रौ ११ वाजता श्रींच्या रथाची मिरवणूक , शुक्रवारी ३ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता नागपूर येथील सुप्रसिध्द किर्तनकार दिगंबरबुवा नाईक यांचे लळीताचे कीर्तन , रात्रौ साडेनऊ वाजता करमणुकीचे कार्यक्रम, शनिवारी ४ एप्रिल रोजी सायं. ४ ते ७ वाजता महिलांचे हळदीकुंकू समारंभ , रात्रौ ९.३० वाजता करमणुकीचे कार्यक्रम , रविवारी ५ एप्रिल सकाळी ६ ते सोमवारी ६ एप्रिल सकाळी ६ वाजेपर्यंत संगीतमय अखंड श्री रामचरित्रमानस उत्तर प्रदेश अयोध्या , सोमवारी ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा सकाळी ११.३० ते दुपारी ३ वाजता महाप्रसाद , रात्रौ ९.३० वाजता भजन संध्या – आर.बी. ब्रदर्स अॅड टीम मुंबई तर मंगळवारी ७ एप्रिल २०२६ रोजी रात्रौ ९.३० वाजता ओम चैतन्य प्रासादिक भजन मंडळ , उंबर्डे , वैभववाडी श्री. श्रीकांत शिरसाट बुवा विरुद्ध श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ कातवण देवगड , कु. सुशांत दिलीप जोईल यांच्या डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे श्री देव मारुती व श्री देव शंकर ट्रस्ट फंड बाजारपेठ दापोली यांनी आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेऊन कार्यक्रमांची शोभा वाढवावी असे आवाहन श्री देव मारुती व श्री देव शंकर ट्रस्ट फंड बाजारपेठ दापोलीचे व्यवस्थापक यांनी केले आहे.


























































