
कोरोना महामारीमुळे आलेली मरगळ झटकून सहकाऱयांत चैतन्य जागवण्याच्या हेतूने कुर्ला पश्चिम येथील श्रीकृष्ण क्रीडा मंडळाने मर्यादित षटकांच्या श्रीकृष्ण प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील एकूण आठ जिह्यांचा समावेश असणारी ही स्पर्धा कोल्हापूर पहिलवान संघाने जिंकली. कोल्हापूर संघाने अंतिम लढतीत साताऱयाचे पराक्रमी संघावर चुरशीची मात करीत जेतेपदाच्या चषकावर आपले नाव कोरले.
या अभिनव स्पर्धेत मुंबई वॉरियर्स, पुणेरी मावळे, कोल्हापुरी पहिलवान, नाशिक टायगर्स, नागपूरचे पुढारी, रत्नागिरीचे वीर, साताऱयाचे पराक्रमी आणि रायगडचे शिलेदार असे आठ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेतील विजेत्या कोल्हापूर संघास जेतेपदाचा चषक आणि रोख रुपये 55,555, तर उपविजेत्या सातारा संघास चषक आणि रोख रुपये 33,333 अशा पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. तिसऱया क्रमांकाच्या संघास चषक आणि रोख रुपये 22,222 चे पारितोषिक देण्यात आले. महेंद्र सांग‘ळे, दीपक पोटे, ओमकार कांबळे आणि तुषार साळवे यांच्या संकल्पनेतून आयोजित या स्पर्धेला किरण सुर्वे, राजा साळवे, मधुकर धस, संतोष उघडे या मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.




























































