
सामना ऑनलाईन । मुंबई
मराठीत दिवसागणिक नवनवीन आशयघन आणि सामाजिक विषयांवरील सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमांमधून अनेक लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांची फौज मराठी चित्रपटसृष्टीला मिळत आहे. लवकरच अशाच एका ताज्या दमाच्या मंडळींचा नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं नाव ‘एक होतं पाणी’ असं आहे. सध्या या सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरू आहे. या सिनेमातून एक नवा चेहरा रसिकांच्या भेटीला येणार आहे. या अभिनेत्रीचे नाव श्रिया मस्तेकर असं आहे.
श्रियाच्या डबिंगचं काम पूर्ण झाल्याची माहिती लेखक आशिष निनगुरकर यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे. यावेळचा एक फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. या फोटोत आशिष निनगुरकर, दिग्दर्शक रोहन सातघरे आणि अभिनेत्री श्रिया मस्तेकर पाहायला मिळत आहे.
सामाजिक विषयाला हात घालणारा ‘एक होतं पाणी’ हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट या सिनेमातून मांडण्यात आली आहे. प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता पाणी वाचवले पाहिजे असा संदेश या सिनेमातून देण्यात येणार आहे.



























































