
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी हिंदुस्थानच्या वन डे आणि टी-20 संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने रोहित शर्माकडून वन डे कर्णधारपद काढून घेत शुभमन गिल याच्याकडे टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. अर्थात रोहितकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले असले तरी त्याचा आणि विराट कोहली याचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्यात आली आहे.
रोहित शर्मा याने कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियाच्या नेतृत्वाची माळ शुभमन गिलच्या गळ्यात पडली. आता वन डे संघाचे नेतृत्वही तोच करणार आहे. मात्र रोहित आणि विराटला वन डे संघात स्थान देण्यात आले आहे. दोघांनीही अखेरचा वन डे सामना 9 मार्च रोजी खेळला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत दोघे न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरले होते. तेव्हापासून दोघेही मैदानात उतरलेले नाहीत.
असा आहे दौरा
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हिंदुस्थानचा संघ तीन वन डे आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला सामना पर्थमध्ये 19 ऑक्टोबर रोजी, दुसरा सामना एडलेडमध्ये 23 ऑक्टोबर रोजी आणि तिसरा सामना सिडनीमध्ये 25 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेला 29 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. टी-20मध्ये हिंदुस्थानचा संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मैदानात उतरेल.
IND vs WI Test – शतकानंतर जडेजाचा गोलंदाजीत ‘चौकार’, अहमदाबाद कसोटीत हिंदुस्थानचा डावानं विजय
टी-20 मालिकेचे वेळापत्रक –
पहिला सामना – 29 ऑक्टोबर, कॅनबरा
दुसरा सामना – 31 ऑक्टोबर, मेलबर्न
तिसरा सामना – 2 नोव्हेंबर, होबार्ट
चौथा सामना – 6 नोव्हेंबर, गोल्ड कोस्ट
पाचवा सामना – 8 नोव्हेंबर, ब्रिस्बेन
🚨 India’s squad for Tour of Australia announced
Shubman Gill named #TeamIndia Captain for ODIs
The #AUSvIND bilateral series comprises three ODIs and five T20Is against Australia in October-November pic.twitter.com/l3I2LA1dBJ
— BCCI (@BCCI) October 4, 2025
हिंदुस्थानचा वन डे संघ –
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल.
हिंदुस्थानचा टी-20 संघ –
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंह व वॉशिंगटन सुंदर.