दिवाळीत ‘श्यामची आई’ येणार भेटीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या चित्रपटाच्या नव्या पोस्टरचे नुकतेच अनावरण झाले. यंदा दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित ‘श्यामची आई’ या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे. चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे, तर सोबत गौरी देशपांडे, बालकलाकार शर्व गाडगीळ, संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठये, मयूर मोरे, उर्मिला जगताप, भूषण विकास, सुनील अभ्यंकर, अक्षया गुरव अशी कलाकारांची फौज आहे. अमृता फिल्म्स निर्मित आणि आलमंड्स क्रिएशनची प्रस्तुती आहे.