सियाचीनमध्ये हिमस्खलन, बर्फाखाली दबून दोन जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सियाचीन ग्लेशिअरच्या दक्षिणेकडे हिमस्खलनाची दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत बर्फाखाली दबून दोन जवान शहीद झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सैन्याचे जवान पेट्रोलिंग करत असताना अचानक आलेल्या बर्फाच्या वादळात ते अडकले. याबाबत माहिती मिळताच हिमस्खलन बचाव दल (एआरटी) तातडीने घटनास्थळी दाखल झालेले. हे पथक बर्फाखाली अडकलेल्या जवानांना काढण्यात यशस्वी झाले. यानंतर या जवानांना सैन्य हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोन जवानांचा मृत्यू झाला.