
सिद्धांत अधटरावच्या 239 चेंडूंतील 211 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर टाटा स्पोर्टस् क्लबने टाइम्स शिल्ड अ गटात रुट मोबाईलविरुद्ध 7 बाद 442 धावांचा डोंगर रचत 344 धावांची आघाडी घेत आपला मोठा विजय निश्चित केला. पहिल्या डावात टाटाने रूट मोबाईलचा 98 धावांत खुर्दा पाडला होता तर त्यांचा दुसरा डाव 215 धावांवर संपवून सामना डाव आणि 129 धावांनी जिंकला. रूट मोबाईलला डावाचा पराभव टाळण्यासाठी अद्याप 210 धावांची गरज होती. पण त्यांचा संघ त्यात केवळ 75 धावांची भर घालू शकले. आज सिद्धांतने टाटाची आघाडी वाढवताना तीन दणदणीत भागीदार्या केल्या. त्याला आनंद बैस (43), चिन्मय सुतार (49) आणि सुजीत नाईक (51) यांनी चांगली साथ दिली. त्यामुळे टाटा चारशेचा टप्पा गाठू शकली. सिद्धांतने आपल्या द्विशतकी खेळीत 24 चौकार आणि 2 षटकारांची बरसात केली.





























































