धक्कादायक! सिद्धार्थच्या निधनाचे वृत्त ऐकून चाहती कोमात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या आकस्मित जाण्याने त्याची एक चाहती देखील आजारी पडली असून तिला तो धक्काच सहन न झाल्याने ती चाहती कोमात गेली आहे.

ट्विटरवर डॉक्टर जयेश ठकेर या नावाने असलेल्या एका प्रोफाईलवरून या तरुण चाहतीचा हॉस्पिटलमधील फोटो शेअर करण्यात आला होता. या फोटोत ती तरुणी कोमात असल्याचे दिसत आहे. सदर तरुणी सिद्धार्थच्या निधनानंतर ओक्साबोक्सी रडत होती व त्यानंतर ती बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी ती काही अंशी कोमात गेल्याचे सांगितले आहे.

दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री कविता कौशिकने देखील याबाबत एक ट्विट केले आहे. ‘सिद्धार्थच्या चाहतीचा आयसीयूमधला फोटो पाहिला. सिद्धार्थ व शेहनाजच्या चाहत्यांना माझी विनंती आहे की कृपया स्वत:ची काळजी घ्या. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांचा विचार करा. सिद्धार्थला हे सर्व पाहून दुख होत असणार. त्याच्या आनंदासाठी कृपया स्वत:ला मजबूत ठेवा आणि या दुखातून बाहेर येण्यासाठी एकमेकांना सहाय्य करा’, असे कविताने या पोस्टमध्ये लिहले आहे.

‘बिग बॉस-13’ चा विजेता आणि छोटय़ा पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (40) याचे गुरुवारी सकाळी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचे निधन झाले. शुक्रवारी त्याच्या पार्थिवावर ओशिवारा स्मशानभूमीत अंत्यसस्कार करण्यात आले.

छोटा पडदा, रिऑलिटी शो गाजवला

सिद्धार्थने केवळ आईच्या हट्टामुळे मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला. 2005 साली त्याने ‘वर्ल्ड बेस्ट मॉडेल’चा किताब पटकावला. ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या मालिकेत तो पहिल्यांदा झळकला. मात्र त्याला खरी प्रसिद्धी ‘बालिका कधू’मुळे मिळाली. ‘लक यू जिंदगी’, ‘ब्रोकन बट ब्युटीफुल 3’, ‘दिल से दिल तक’मध्येही तो झळकला. ‘बिग बॉस 13’ आणि ‘खतरोंके खिलाडी 7’ चा तो विजेता होता. ‘सावधान इंडिया’ आणि ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मधून सिद्धार्थने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.