सिद्धार्थ रुग्णालयातील पोस्टमॉर्टम केंद्र बंद असल्याने नातेवाईकांचे हाल, शिवसेनेकडून आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगाव येथील पालिकेच्या सिद्धार्थ रुग्णालयामधील राज्य शासनाच्या अखत्यारीतील शवविच्छेदन पेंद्र ऐन गणेशोत्सवात बंद केल्याने मृतांच्या नातेवाईकांना प्रचंड धावाधाव करावी लागत आहे. यामध्ये नाहक वेळ जात असून आर्थिक भुर्दंड पडत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. याची गंभीर दखल घेत शिवसेना शिष्टमंडळाने आज संबधित प्रशासनाला याबाबत जाब विचारून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यामध्ये दिरंगाई केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आल्याचे विधानसभा संघटक व माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी सांगितले.

गोरगाव पश्चिम येथील पालिकेचे सिद्धार्थ रुग्णालय नव्याने बांधण्याचे प्रस्तावित असल्याने 2019 पासून बंद आहे. मात्र या ठिकाणी राज्य शासनाच्या गृह विभागाअंतर्गत असणारे शव विच्छेदन पेंद्र सुरू होते. गोरेगाव, मालाड, बांगुर नगर, आरे वनराई, दिंडोशी परिसरातील नागरिकांना या शवविच्छेदन पेंद्रामुळे सुविधा मिळत होती. यामध्ये शवविच्छेदन करणे, विविध कारणास्तव काही तासांसाठी – काही दिवसांसाठी मृतदेह ठेवणे सोयीस्कर ठरत होते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून हे शवविच्छेदन पेंद्र कोणतीही सूचना न देता बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी नाहक हेलपाटे मारावे लागत असून अंधेरी कूपर, बोरिवली भगवती पिंवा परिसरातील रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे.

या ठिकाणच्या डॉक्टरचे प्रमोशन झाले, बदली झाली अशी कारणे दिली जात आहेत. मात्र यामध्ये नागरिकांचा वेळ आणि पैसाही वाया जात आहे. त्यामुळे संबंधित शवविच्छेदन पेंद्र तातडीने सुरू करावे अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. यावेळी विधानसभा संघटक दिलीप शिंदे, राजू पाध्ये, विजय आयरे, चंद्रकांत मोरे, विनोद माने, बाळा सोनवणे, संदीप लाखण, महेंद्रा इंगवे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.