गुढीपाडव्यानिमित्त मध्यरात्री दीड वाजल्यापासून सिद्धिविनायक मंदिर खुले राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

गुढीपाडव्यानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी प्रभादेवीचे श्री सिद्धिविनायक मंदिर शनिवारी पहाटे 1.30 वाजल्यापासून सुरू राहणार आहे. पहाटे 1.30 ते रात्री 9.45 पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहील. श्रींची आरती पहाटे 5.30 ते 6 या वेळेत आणि संध्याकाळची आरती सायंकाळी 7.30 ते 8 या वेळेत होईल. श्रींचा नेवैद्य दुपारी 12.05 वाजता दाखवण्यात येईल. तर शेजारती रात्री 9.50 वाजता होणार आहे, अशी माहिती सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने देण्यात आली आहे.

बाप्पाच्या दागिन्यांचा लिलाव

श्रींच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या विविध दागिन्यांचा लिलाव गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणार आहे. शनिवार, 6 एप्रिल रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत मंदिरातच दागिन्यांचा लिलाव होईल. लिलावासाठी उपलब्ध असलेले अलंकार लिलावाच्या दिवशीच मंदिराच्या आवारात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतील. भक्तांनी या लिलावात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन न्यास व्यवस्थापन समितीने केले आहे.