
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा आगामी चित्रपट ‘जबरिया जोडी’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटासह दोघेही आपले रिलेशनशीप आणि अफेअरमुळेही चर्चेत असतात. याच संदर्भात एका मुलाखतीमध्ये दोन्ही कलाकारांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत.
लव्ह, अफेअर्स बाबत सिद्धार्थला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, माझ्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही. चित्रपटातील माझ्या भूमिकेतील व्यक्तीरेखा जसे म्हणते की, मला सेक्सपेक्षा खुर्चीवर आहे, तसेच माझे लक्ष सेक्सपेक्षा चित्रपटांवर आहे. तो पुढे म्हणाला की, मला वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळत आहेत आणि यात मला आनंद मिळत आहे. या चित्रपटाकडूनही मला खूप अपेक्षा आहे, असेही तो म्हणाला.
परिणीतीला असाच एक प्रश्न विचारला असता ती म्हणाली की, जोपर्यंत माझे लग्न होत नाही तोपर्यंत मी सिंगलच राहणार आहे. जेव्हा माझे लग्न होणार असेल तेव्हाच मी माझे रिलेशनशीप जाहीर करेन, असेही ती म्हणाली.
‘जबरिया जोडी’चा ट्रेलर –






























































