नवज्योतसिंग सिद्धूचे खलिस्तानी कनेक्शन, खलिस्तानी दहशतवाद्याने प्रसिद्द केला फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बाजवा यांना मिठी मारल्यावरून वादात अडकलेले माजी क्रिकेटर व पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू आता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गुरुवारी पाकिस्तानातील करतारपूर साहिब कॉरिडॉरच्या भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित असलेल्या गोपाल चावला या खलिस्तानी दहशतवाद्याने सिद्धू सोबतचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. त्यामुळे खलिस्तानी दहशतवाद्यांशी कनेक्शन असल्याचे आरोप सिद्धूवर होत आहेत. या कार्यक्रमात पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बाजवा यांच्यासोबत गोपाल चावला हस्तांदोलन करतानाही दिसला होता.

करतारपूर कॉरिडोअरच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभागी झाला खलिस्तानी दहशतवादी

बुधवारी पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांनी करतारपूर साहिब कॉरिडॉरच्या भूमिपूजन केले. या कार्यक्रमात हिंदुस्थानतर्फे केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि हरदीप सिंग पुरी हे सहभागी झाले होते. या कार्यक्रमात नवज्योसिंग सिद्धू देखील सहभागी झाला होता. हाफिज सईदचा समर्थक असलेला खलिस्तानी दहशतवादी गोपाल चावला देखील पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बाजवा यांच्यासोबत तेथे आला होता. या फोटोवरून विरोधकांनी सिद्धूवर टीकेचा भडिमार सुरू केला असून त्याच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.