सिंधुदुर्गात लसीचा साठा संपला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिह्यात 56 लसीकरण केंद्रांमधून आतापर्यंत 61 हजार 58 जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. जिह्यात या लसीचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी वाढत असतानाच आज जिह्यातील लसीचा साठा संपला आहे. मात्र जिह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस उपलब्ध नाहीत. त्यामुळे जिह्यातील अनेक केंद्रांवर लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना लस न घेताच मागे परतावे लागते. तसेच इच्छुक नागरिकांचा हिरमोड झाला. आज रात्रीपर्यंत लस साठा उपलब्ध न झाल्यास 56 लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत. याला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दुजोरा दिला आहे.

आज जिल्हा परिषदेमार्फत कर्मचाऱयांना लस मिळावी यासाठी जिल्हा रुग्णालयात 50 कर्मचाऱयांची यादी सादर करण्यात आली होती. मात्र यातील काही ठराविक कर्मचाऱयांनाच लस देण्यात आली. तर उर्वरित कर्मचाऱयांना परत पाठविण्यात आले. त्यामुळे लस न मिळालेल्या कर्मचाऱयांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.