
गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील ‘श्रीं’च्या मूर्तीला बुधवार, 7 जानेवारी ते रविवार, 11 जानेवारी या कालावधीत सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. या कालावधीत भाविकांना श्रींच्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही, परंतु या कालावधीत श्रींच्या प्रतिमूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येईल. सोमवार, 12 जानेवारी या दिवशी ‘श्रीं’च्या मूर्तीचे प्रोक्षणविधी, नैवेद्य व आरती झाल्यानंतर दुपारी 1 वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभाऱयातून श्रींचे दर्शन घेता येईल, अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने देण्यात आली आहे.


























































