गायिका नेहा कक्कर अडकली लग्न बंधनात, पाहा व्हिडीओ

बॉलिवूडची प्रसिद्ध गायक नेहा कक्कर ही तिचा बॉयफ्रेंड रोहनप्रीतसोबत लग्नबंधनात अडकली आहे. नेहा व रोहनप्रीतने शीख पद्धतीनुसार गुरुद्वाऱ्यात लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नात नेहाने गोल्डन रंगांचा लेहेंगा घातला असून त्यालाच सूट होणारी गोल्डन रंगाची शेरवाणी रोहनप्रीतने घातली आहे.

नेहाचा 20 ऑक्टोबर रोजी रोहनप्रीत सोबत साखरपुडा झाला होता. साखरपुड्यानंतर 23 तारखेला संगीत व 24 तारखेला हळदीचा कार्यक्रम होता. गेल्या तीन चार दिवसांपासून त्यांच्या घरी लग्नाची धामधूम सुरू होती. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

आपली प्रतिक्रिया द्या