कंटेनर मोटरसायकल अपघातात तरुणी ठार

937

सिन्नर ते शिर्डी रोडवर देर्डे कोर्‍हाळे शिवारात भरधाव वेगाने जात असलेल्या कंटेनरने होंडा या मोटरसायकलला दिलेल्या धडकेत किरण संतोष गडाख वय 18 हीचा मृत्यू झाला. तर विकास निरगुडे हे जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी 9.15 वा.सुमारांस घडली. घटना घडल्या नंतर कंटेनर चालक पळून गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक अर्जुन निरगुडे याचा चुलत भाऊ विकास व त्यांची भाची किरण संतोष गडाख हे होंडा मोटरसायकलवरून पाथरे येथुन कोपरगांवकडे येत असतां देर्डे कोर्‍हाळे शिवारात सिन्नरहुन कंटेनर ट्रेलर जोरात आला व त्याने मोटर सायकलला धडक दिली. या धडकेत किरण गडाख ही कंटेनरच्या खाली जावून जागीच मृत्यू झाला. तर विकास नवनाथ निरगुडे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघात घडल्यानंतर कंटेनर चालक ट्रेलर सोडून पळुन गेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या