
नोबल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांना निवडणूक आयोगाने SIR चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांनी ही माहिती दिली आहे. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि अभिनेते देव यांना नोटीस बजावल्यानंतर आता निवडणूक आयोगाने नोबल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनाही नोटीस बजावली आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. अमर्त्य सेन यांनी देशाला नोबल पुरस्कार मिळवून दिला आहे. जागतिक पातळीवर देशाचे नाव उंचावले आहे. हा लोकांना त्रास देण्याचा प्रकार आहे, असे अभिषेक बॅनर्जी यांनी एका रॅलीत म्हटले आहे.
अद्याप याबाबत निवडणूक आयोगाकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.





























































